देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ६१ लाखांचा टप्पा; गेल्या २४ तासात ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने आता ६१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात देशात ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६१ लाख ४५ हजार २९२ वर पोहोचली आहे. तर ९ लाख ४७ हजार ५७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५१ लाख १ हजार ३९८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९६ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत