देशात परिवर्तन दिसायला लागले : शरद पवार

 

देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हायची असेल तर शेती अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी; मात्र, त्याकडं दुर्लक्ष झालं आहे, असं सांगतानाच, ‘देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तांतर होईल,’ असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं आहे.
नगर जिल्ह्यातील लाल निशाण पक्षाचे लढवय्ये नेते माजी आमदार कै. कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या पहिल्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत राहुरी तालुक्यातील सात्रळ या गावात झाला. त्या वेळी ते बोलत होते. पवार यांनी केंद्रातील नरेद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘सत्ता हातात आल्यावर त्याचा वापर किती व कसा केला जातो यावर सरकारचे यश अवलंबून असते. देशातील अर्थव्यवस्था मजबुतीसाठी शेती अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी; मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे. काळ्या आईशी इमान दाखविल्याशिवाय आर्थिक क्रयशक्ती कधीच वाढणार नाही. शेतीमालाचे भाव सतत कोसळत आहेत. खते, बियाणे यांचे दर सतत वाढत राहणे या गोष्टी चिंता करायला लावणाऱ्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत