देशात २४ तासात ४८ हजार नावे रुग्ण; तर ५६३ मृत्यू

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने काल ८० लाखांचा टप्पा देखील ओलाडंला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४८ हजार ६४८ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, ५६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८० लाख ८८ हजार ८५१ वर पोहचली आहे. यापैकी ५ लाख ९४ हजार ३८६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७३ लाख ७३ हजार ३७५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख २१ हजार ०९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत