देशात २४ तासामध्ये १९ हजार ५५६ नवे कोरोनाबाधित; तर ३०२ मृत्यू

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

India's Corona curve recorded 10,004,599 cases with deaths 14,51,36 - Sentinelassam

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचा वेग कमी झाला असला तरी अजून धोका टळलेला नाही.  देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासामध्ये देशभरात १९ हजार ५५६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात ३० हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ७५ लाख ११६  वर पोहचली आहे. यापैकी २ लाख ९२ हजार ५१८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ९६ लाख ३६ हजार ४८७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णबरं होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के इतकं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत