देश घेईल तो निर्णय मान्य : विराट कोहली

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानशी खेळायचं की नाही या प्रश्नावरून सध्या देशात मतमतांतरे ऐकायला मिळत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की देश ठरवेल तो निर्णय मला आणि संघाला मान्य असेल.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला ही देशासाठी दु:खद घटना होती, हल्ल्यात शहीद झालेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करतो’ असं विराट कोहलीने पत्रकार परिषदेत म्हटलं. विश्वचषक स्पर्धेत 16 जूनला भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने खेळू नये अशी देशभरातील असंख्य लोकांची इच्छा आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला T20 सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी आज विराट कोहलीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात बोलताना विराट कोहलीने सांगितले की BCCI आणि केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. बीसीसीआयने याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडे सोपवला आहे, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष केंद्र सरकार या सामन्याबाबत काय भूमिका घेतं याकडे लागलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत