दोनदा वर्ल्डकप जिंकून देणारा ‘हा’ कर्णधार आज नोकरीच्या शोधात

 

मुंबई : एकाच खेळात ‘प्रसिद्धी’लाही दोन पैलू असू शकतात.

भारतात क्रिकेटसारख्या खेळातही यश, पैसा या गोष्टी अस्थिर आहेत. एकेकाळी भारताला दोन वर्ल्डकप जिंकवून देणारा खेळाडू आज नोकरीच्या शोधात आहे.

शेखर नायक
दोनदा भारताच्या नेत्रहीन वर्ल्डकप विजेत्या संघामध्ये शेखर नायकचा समावेश होता. मात्र आता त्यांच्याकडे नोकरी नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शेखर नायक यांनी भारताला दोनदा वर्ल्डकप मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली. 13 वर्षते भारतीय संघाचे खेळाडू होते. मात्र आता त्यांच्याकडे नोकरी नसल्याने बेरोजगारीची वेळ आली आहे.

सरकारकडे याचना
जेव्हा माझं कौतुक होतं तेव्हा आनंद होतं. मात्र पत्नी आणि मुलींसाठी चिंतितही होतो. सरकारकडे यापूर्वी अनेकदा नोकरीसाठी याचना केल्याची माहिती शेखर यांनी दिली आहे. मात्र अजूनही ते नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.