दोन एसकेंच्या भेटी मुळे पुण्यात राजकीय चर्चेला उधाण

संजय काकडे आणि सुरेश कलमाडी यांची भेट

  • राजकीय गुप्तगू झाल्याने चर्चांना उधाण
  • डॉ. पी ए इनामदार यांनी घडवून आणली भेट

रायगड माझा ऑनलाईन

पुण्यातील दोन ‘एस के’ म्हणजेच खासदार संजय काकडे आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांची आज भेट झाली. त्यांच्यात बराचवेळ राजकीय गुप्तगू झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या आजच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार संजय काकडे यांनी नुकतेच आपणही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मुस्लिम समाजातील सन्माननीय असलेले डॉ. पी ए इनामदार यांच्या समवेत खासदार काकडे यांनी पुण्याच्या राजकारणात एक तपाहून अधिक काळ ‘सबसे बडा खिलाडी’ राहिलेल्या काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याबरोबर या भेटीदरम्यान बराचवेळ राजकीय चर्चा झाली.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत वर्तविल्या वाचू अंदाजामुळे काकडे प्रकाशात आले . देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर मर्जी असल्याचेही बोलले जाते. खासदार संजय काकडे इच्छुक झाल्याने भाजपमधील स्पर्धेत चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय काकडे आणि सुरेश कलमाडी या दोन एस के ची भेट पुण्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना ,याचीच आता चर्चा होत आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत