दोन कुटुंबातील सात जण एकाएकी गायब; शोध सुरु

सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन बुधवारी दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. मात्र काल (बुधवारी) दुपारी 11 वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद लागत आहेत.याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस या दोन्ही कुटुंबांचा शोध घेत आहेत.

Pune

पुणे : रायगड माझा वृत्त

हडपसर येथील सातव व मगर कुटुंबीय मंगळवारी खडकवासला येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दोन्ही कुटुंबातील मिळून 7 जण होते. बुधवार सकाळपासून त्यातील 5जणांचे फोन बंद आहेत. हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हवेली पोलिस अधिक तपास करीत आहे.

शहराच्या पूर्वभागातील हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबांशी काल बुधवार पासून संपर्क होत नाहीये. मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्कात नसल्याने या कुटुंबीयांचे नातेवाईक काळजीत आहेत.  सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे) त्यांची पत्नी स्नेहल उर्फ ईश्वरी मगर, जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (5 वर्षे) त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे सात जणांचा संपर्क होत नाही. असे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासह मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले होते. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या मधील अॅक्वेरियस हॉटेलात मुक्कामही केला.

सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन बुधवारी दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. मात्र काल (बुधवारी) दुपारी 11 वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद लागत आहेत.याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस या दोन्ही कुटुंबांचा शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत