दोन जीव गेल्यावर आयआरबीला जाग…

मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी झालेल्या दुचाकि अपघातातील मृतांची संख्या दोन झाली असून गावाच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी असावा या ग्रामस्थांच्या मागणीला दोन जीव गेल्यावर आयआरबीने प्रतिसाद देत रम्बलिंग स्ट्रिप काम सुरू केले.

खालापूर : मनोज कळमकर

बुधवारी 2 मे च्या दुपारी साङेतीनच्या सुमारास वावंढळ गावात लग्न आटपून संतोष तुकराम घोलप (वय 25,रा.वावंढळ), जयवंत रामभाऊ भऊङ (वय27,रा.वावंढळ वाङी) आणि बबन नामदेव जाधव (वय 59,रा.मोठे वेणगाव कर्जत) हे दुचाकी क्रमांक एमएच-46-एम-6937 वरून चौक येथे जाण्यासाठी निघाले असताना वावंंढळ फाटा येथे भरधाव वेगात जाणारा ट्रेलर क्रमांक एमएच-46-एच-4366 ची जोरदार धडक दिली होती. या अपघातात बबन जाधव यांचा जागीच मत्यू झाला. तर जयवंत भऊङ आणि संंतोष घोलप यांच्या ङोक्याला आणि  हाता-पायाला गंंभीर दुखापती झाल्या होत्या. गंभीर जखमी संतोष घोलप याचा बुधवारी राञी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जयवंत भऊङ याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

कालच्या अपघातानंतर वावंढळ ग्रामस्थांचा संतप्त उद्रेक पाहून आयआरबीकङून वावंढळ फाटा येथे गुरूवारी तातडीने रम्बलिंग स्ट्रिप मारण्याचे काम सुरू झाले. आयआरबीने स्वागत ऑर्केस्ट्रा बार, म्हाञे फार्म हाऊस आणि रिंकी हाॅटेल येथे बेकायदा लेन कटिंग ठेवली असून वावंढळ येथील अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत