धक्कादायक! आईच्या चितेच्या शेजारीच मुलानं केली आत्महत्या

son committed suicide At the place of mother's funeral | धक्कादायक! आईच्या चितेच्या शेजारीच मुलानं केली आत्महत्या

लातूर : रायगड माझा वृत्त

लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात आईच्या चितेच्या बाजूलाच मुलानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलानं स्वतःला स्कॉर्पिओ गाडीत बंद करून पेटवून घेत आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. गजानन कोडलवाडे याच्या आईचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन दिवसांनंतर स्कॉर्पिओतून त्याच ठिकाणी जाऊन मुलानंही आत्महत्या केली आहे. गजानननं काल रात्री आईच्या चितेजवळ स्कॉर्पिओ गाडी नेली, त्यानंतर गाडीवर डिझेल टाकून पेटवून घेतले. विशेष म्हणजे त्यानं स्वतःला गाडीत बंद केले आणि मग गाडी पेटवून दिली. या प्रकारानंतर अहमदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गजानन याची दोन लग्नं झाली होती. कौटुंबिक वाद वाढत असतानाच आईचा मृत्यू झाल्यानं गजानन नैराश्येच्या गर्तेत अडकला आणि त्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत