धक्कादायक! इगतपुरी मधे तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Shocking attempt to burn the three persons in Nashik | धक्कादायक! नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नाशिक : रायगड माझा वृत्त 

इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तिघेही जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून, तो गंभीर आहे. इगतपुरीमधील कोपरी मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच तीन जणांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पूर्ववैमनस्यातून तिघा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रशांत बंडू बोरसे, दीपक बंडू बोरसे,सुरेश गुप्ता जखमींची नावे. कुणाल किशोर हरकरे याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत