धक्कादायक! ओडिशात मुलाने सायकलवरून नेला आईचा मृतदेह

भुवनेश्वर : रायगड माझा ऑनलाईन 

ओडिशातील कर्पाबाहाल गावात एका मागास जातीतील महिलेच्या मृतदेहाला खांदा देण्यास देखील गावकऱ्यांनी नकार दिल्यामुळे त्या महिलेच्या अल्पवयीन मुलाला सायकलवरून आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. पीडित मुलाने त्याच्या आईचा मृतदेह जंगलात नेऊन एकट्याने पुरल्याचे देखील समजते.

जानकी सिन्हानिया असे त्या महिलेचे नाव असून तिच्या पतीचे दहा वर्षापूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर ती तिच्या मुलांसहीत दुसऱ्या गावात येऊन राहू लागली होती. दोन दिवसांपूर्वी पाणी भरण्यासाठी बोरिंगवर गेली असता तिथे पाय घसरून ती पडली व त्यात तिच्या डोक्याला दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जानकीचा 17 वर्षाचा मुलगा सरोज याने आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना खांदा द्यायला सांगितला. मात्र जानकी ही मागास जातीतील असल्यामुळे गावकऱ्यांनी त्याला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर सरोजने त्याच्या सायकलच्या मागच्या सीटवर लांबलचक लाकूड बांधून त्यावर आईचा मृतदेह बांधला. त्या सायकलला चार ते पाच किलोमीटरपर्यंत धक्का मारत त्याने जंगलात नेले व तिथेच आईवर अंत्यसंस्कार केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत