धक्कादायक! कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक

पुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार पुण्यात घडला असून गुंड गजानन मारणे याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. एकीकडे करोनाचं संकट अद्यापही पूर्पणणे टळलं नसल्याने गर्दीवर बंधनं असताना दुसरीकडे पुण्यात कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समर्थकांनी तब्बल ३०० वाहनांचा ताफा सोबत घेत ही मिरवणूक काढली.

गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं. पुण्यात गेल्या काही वर्षात टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत कारागृहात रवानगी केली होती. याचदरम्यान अमोल बधेपप्पू गावडे आणि आणखी एका हत्येप्रकरणी गुंड गजानन मारणे याची मोक्काअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने तिथे होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. दरम्यानसोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गजानन मारणेची सुटका करण्यात आली. त्यानंतर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यापर्यंत त्याचं शक्तिप्रदर्शन पहायला मिळालं. रात्री उशिरा तो कोथरुडमधील आपल्या घरी पोहोचला. मात्र त्याच्या पुण्यातील एन्ट्रीची एकच चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत