धक्कादायक; कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

संभाजीनगर : रायगड माझा वृत्त

संभाजीनगर जवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद टी पाँईट ते माळीवाडा दरम्यान पहाटे चार वाजेच्या ही दुर्घटना घडली. पराग कुलकर्णी आणि अरूण काकडे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही जण बजाज फायन्स कंपनीत कामाला होते. या अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता. क्रेन मागवून ही कार रस्त्यातून बाजूला करावी लागली.

पराग कुलकर्णी हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. गेली काही वर्ष कामानिमित्ताने तो संभाजीनगरातील तारांगण कासलीवाल इथल्या जी-5 सेक्टरमध्ये राहत होता. पराग हा कामानिमित्ताने मित्रासोबत बाहेर गेला होता. काम संपवून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी दोघे मृत झाल्याचं घोषित केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत