धक्कादायक! जेवणात मिळाले रक्ताने माखलेल बँडेज

चेन्नई  : रायगड माझा ऑनलाईन 
Balamurugan had placed an order from a restaurant named ‘Chop N Stix’. (Photo: Facebook/Balamurugan Deenadayalan)

चैन्नईत राहणाऱ्या बालामुरुगन दीनदयालन या व्यक्तीने स्विगीवरून आपल्यासाठी मांसाहारी जेवण मागवले होते. जेवणाचे पाकिट उघडून बालामुरुगन यांनी जेवायवा सुरु केले. मात्र, अर्धे जेवण झाल्यानंतर त्याला जेवणात एक बँडेज आढळून आलं. शिवाय त्या बँडेजला रक्त लागल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. बालामुरुगनने लागलीच रेस्टॉरंटकडे तक्रार केली. मात्र, त्या रेस्टॉरंटने त्याबाबत काहीही प्रतिसाद दिला नाही.

यानंतर बालामुरुगनने फेसबुकवर पोस्ट लिहून हा प्रकार जगापुढे उघड केला. या पोस्टमध्ये त्याने स्विगीलाही टॅग केले. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बालामुरुगन लिहितो, ‘अतिशय घाणेरडा प्रकार, मी अर्ध जेवण खाल्ल्यानंतर जेवणात रक्त लागलेले बँडेज आढळलं. मी लगेच रेस्टॉरंटशी संपर्क साधला. पण त्यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. आम्ही दुसरे जेवण पाठवतो एवढेच ते म्हणाले. अशा प्रकारचे जेवण कोण खाणार आहे?. मी स्विगीशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकदा का डिलिव्हरी झाली की मग स्विगीशी कॉलद्वारे बोलण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यांच्याशी चॅटवर बोलता मात्र येते. मात्र तिथे ते प्रतिसाद देत नाहीत.’

कोर्टात जाणार!

घडलेल्या प्रकारानंतर बालामुरुगनने कोर्टाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट आणि स्विगी या दोघांच्याही विरोधात तो खटला दाखल करणार आहे. स्विगीची अनेक रेस्टॉरंटशी भागीदारी आहे. रेस्टॉरंट्स स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत असेही बालामुरुगनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

स्विगीने मागितली माफी

घडलेल्या प्रकाराबाबच स्विगीने मात्र माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही स्विगीने दिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत