धक्कादायक..! तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना

वसतिगृहाच्या वार्डनने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप

एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस येथील वसतिगृहाच्या वार्डनने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. येथील  एका विद्यार्थीनीने तोकडे आणि बिनबाह्यांचे कपडे घातले म्हणून वसतिगृहाच्या वॉर्डनने मुलीला नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसतिगृहाच्या वर्डनला निलंबित करण्यात आले आहे.

एसएनडीटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने तोकडे आणि बिनबाह्यांचे कपडे घातले, म्हणून त्या विद्यार्थीनीस एका खोलीत नेऊन नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. याप्रकरणी वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी आंदोलन केले. एसएनडीटी विद्यापीठ प्रशासनाने या वार्डनला चार दिवस निलंबित केले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले.

मासिक पाळीदरम्यान लैंगिक अवयवांच्या ठिकाणी संसर्ग झाल्याने डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सैल कपडे घालत असल्याचे तक्रारदार विद्यार्थिनीने नमूद केले. रविवारी मैत्रिणीसोबत डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी वॉर्डन झवेरी यांनी कपड्यांवरून टीका करण्यास सुरुवात केली. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत जबरदस्तीने एका खोलीत नेले. नेमका कुठे त्रास होतो ते दाखविण्यासाठी अंगावरील कपडे उतरवायला लावले, असे पिडित मुलीचे म्हणणे आहे. सांताक्रुझ पोलिसांनी झवेरी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर यांनी दिली.

या प्रकरणी चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत