धक्कादायक; दहावीत शिकणारी 4 मुलं एकाच वेळी बेपत्ता, परिसरात खळबळ

मालेगाव : रायगड माझा वृत्त 

मालेगावमध्ये दहावीत शिकणारे 4 विद्यार्थी कालपासून बेपत्ता झाले आहेत. काल क्लासला जात असताना ते बेपत्ता झाले आहेत. कालपासून पोलीस आणि नातेवाईक या चौघांचा शोध घेत आहेत. पण एकाच वेळी अशी 4 मुलं बेपत्ता झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

दहावीत शिकणारी 4 मुलं एकाच वेळी बेपत्ता, परिसरात खळबळ

 

प्रेम अण्णाभाऊ बोरसे, आकाश कैलास सोनवणे, साहिल सचिन घोरपडे, ध्रुव अतुल शिरोडे अशी या मुलांची नावे आहेत. क्लासला जाताना हे सर्वजण सोबत जात होते पण त्यानंतर त्यांचा अजूनपर्यंत काहीच पत्ता लागला नाही. क्लास सुटून बराच वेळ झाला पण मुलं घरी आली नाहीत म्हणून पालकांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.बराच वेळ मुलांचा शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांसह बेपत्ता मुलांच्या नातेवाईकांनी रात्रभर मुलांचा शोध घेतला पण अद्याप त्यांचा कुठेच शोध लागला नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी मालेगावमध्ये मुलं पळून नेणारी टोळी या संशयावरून काही लोकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी अशी कोणतीही अफवा पसरू नये याची पोलिसांनी काळजी घेतली आहे. तर स्थानिकांच्या आणि या चारही मुलांच्या नजिकच्या लोकांची चौकशी करून पोलीस मुलांचा शोध घेत आहे. तर कोणताही गैरसमज न करता मुलांचा शोध घेऊयात असं पोलिसांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत