धक्कादायक; दारूसाठी मुलाकडून वडिलांचा खून

नंदुरबार : रायगड माझा वृत्त

दारूसाठी पैसे दिले नाही, याचा राग येवून मुलाने वडिलांवर लाकडी दांडक्याने वार करून जागीच ठार केल्याची घटना नवानागरमुठा, ता.नवापूर येथे घडली. अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला अटक करण्यात आली आहे.

राजाराम माणक्या तडवी (53) रा.नवानागरमुठा, ता.अक्कलकुवा येथे मयताचे नाव आहे. तर संजय राजाराम तडवी असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नवानागरमुठा येथील राजाराम माणक्या तडवी यांचा लहान मुलगा संजय राजाराम तडवी यास दारूचे व्यसन होते. यासाठी तो नेहमीच वडीलांकडे दारूसाठी पैसे मागत होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याने वडील राजाराम यांच्याकडे पैसे मागितले. ते त्यांनी दिले नाही. त्याचा राग येवून संजय तडवी यांनी राजाराम यांच्यावर लाकडी दांडक्याने वार करून जागीच ठार केले.
याबाबत रणजीत राजाराम तडवी यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिल्याने संजय तडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत संजय तडवी यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत