धक्कादायक; दिल्लीत मराठी कुटुंबात दुहेरी हत्या

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

राजधानी दिल्लीत राहणाऱया पाठक या मराठी कुटुंबात दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांनी घरातल्या काही कामासाठी प्लंबर बोलावला होता. त्यामुळे प्लंबरनेच त्या दोघींची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. सोसायटीतले सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस पुढील तपास करत आहेत. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. पाठक कुटुंबाकडे प्लंबिंगच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने दोघींचा जीव घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धारदार शस्त्राने वार करून दोघींचा गळा आवळल्याची प्राथमिक माहिती आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत