धक्कादायक! पोलिसच बनले अपहरणकर्ते, गुन्हेगाराच्या पत्नीकडे मागितली दीड कोटीची खंडणी

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

पोलीस नेहमी गुन्हेगाराला पकडण्याचे काम करतात पण दिल्लीमध्ये बिलकुल याउलट घटना घडली आहे. दिल्लीच्या रानहोला पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या तीन पोलिसांनीच एका गुन्हेगाराचे अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी पत्नीकडे दीडकोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या तिन्ही पोलिसांविरोधात अपहरण आणि खंडणीच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आम्ही असे चुकीचे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. आम्ही तिघांना अटक केली आहे दिल्ली दक्षिण रेंजचे पोलीस अधिकारी आर.पी.उपाध्याय यांनी सांगितले.

पोलीस नेहमी गुन्हेगाराला पकडण्याचे काम करतात पण दिल्लीमध्ये बिलकुल याउलट घटना घडली आहे. दिल्लीच्या रानहोला पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या तीन पोलिसांनीच एका गुन्हेगाराचे अपहरण करुन त्याच्या सुटकेसाठी पत्नीकडे दीडकोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

या तिन्ही पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मयुरा एनक्लेव्ह भागातून अटक करण्यात आली आहे. या अपहरणात सहभागी असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुबे सिंह, हेड कॉन्स्टेबल इंदू पावात आणि कॉन्स्टेबल अजय कुमार यांना दिल्ली पोलीस सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.

या तिन्ही पोलिसांविरोधात अपहरण आणि खंडणीच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आम्ही असे चुकीचे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. आम्ही तिघांना अटक केली आहे दिल्ली दक्षिण रेंजचे पोलीस अधिकारी आर.पी.उपाध्याय यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत