धक्कादायक; प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे लावल्याने पुण्यात खळबळ

sensation in the Hadapsar area Due to threatening letter | प्रेमभंग झालेल्या प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे लावल्याने पुण्यात खळबळ

पुणे : रायगड माझा वृत्त

प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसीला धमकी देणारी पत्रे हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या परिसरात लावल्याने एकच खळबळ उडाली असून याची माहिती मिळताच पोलिसांनी ही सर्व पत्रे काढून जप्त करण्यास सुरुवात केली आहे.हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजच्या समोर रस्त्यावरील खांबावर काही जणांना ही पत्रे लावलेली आढळून आली. कॉलेजला येणाऱ्या तरुणांना ते समजल्यावर ती वाचण्यासाठी तेथे एकच झुंबड उडाली. ही बातमी काही वेळात सर्वत्र पसरली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी आले. व त्यांनी ती पत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अनेक पत्रे परिसरात लावण्यात आली आहेत.

या पत्रात म्हटल्याप्रमाणे आकाश नाव सांगणाऱ्या तरुणाने ही पत्रे लिहिली असून त्यामध्ये तो एका तरुणीशी रिलेशनशीपमध्ये होता. गेल्या वर्षी त्यांनी घरच्यांना न सांगता गुपचूप लग्न केले होते. दोघेही एकत्र राहत होते. पण काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून गेली. कारण तिचे त्याच्या आईशी पटत नव्हते. तिला पैसा खूप महत्वाचा असून ती आता दुसऱ्याबरोबर लग्नाला तयार झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एवढ्या वर्षाच्या रिलेशनशीप नवरा बायकोचे नातं तोडून ती कोण कुठल्या तरुणाबरोबर लग्न करीत आहे. जी मला सोडून आली. ती काय कोणाची राहणार असे म्हणून मी तुला राहून देणार नाहीच अशी धमकी या आकाशने त्या तरुणीला दिली आहे. हडपसर पोलीस आता या आकाशचा शोध घेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत