धक्कादायक; फसवणुकीच्या रोषातून मित्राची हत्या

कल्याण : रायगड माझा वृत्त 

सरकारी नोकरी लावतो, असे सांगून तब्बल 35 लाख रुपये घेऊन नोकरी न मित्राची लॉजवर हत्या केल्याची घटना आज कल्याणमध्ये घडली. अनिल सानप असे मृताचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे याला अटक केली आहे.

कल्याणमध्ये राहणाऱया अनिल सानप व संतोष बरदडे हे दोघे मित्र होते. अनिलने आरोपी संतोषला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत त्याच्याकडून 35 लाख रुपये घेतले होते. मात्र पैसे घेऊन बराच कालावधी लोटला. तरीही नोकरी न मिळाल्याने संतोषने अनिलकडे पैसे परत मागितले. मात्र अनिलने टाळाटाळ केली असता संतोषला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आपल्या मित्रानेच आपली फसवणूक केल्याने संतोष संतापला होता.

या रागातूनच त्याने कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज परिसरात टय़ुक्स लॉजमध्ये अनिलला बोलवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी संतोष हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिल याने सरकारी नोकरी लावण्यासाठी 35 लाख रुपये घेतले होते. मात्र नोकरीही लागली नाही, अनिल पैसेही देत नव्हता. त्यामुळे आपण हे पृत्य केल्याची कबुली संतोषने पोलिसांना दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत