धक्कादायक; भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा

Dombivali

डोंबिवली : रायगड माझा वृत्त

डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170 शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. धनंजय कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून तो भाजपाचा पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. कल्याण सत्र न्यायालयाने मंगळवारी धनंजयला पोलिस कोठडी सुनावली आहे.

मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास  दुकानात छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे.

कुलकर्णी हा भाजपचा पदाधिकारी असल्याची चर्चा शहरात जोर धरु लागल्याने यावर आता भाजपातील वरिष्ठ पदाधिकारी काय खुलासा करतात ते पाहावे लागेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत