धक्कादायक ! भिवंडीत ड्रेनेज लाईनमध्ये अडकून बाप लेकाचा मृत्यू

भिवंडी : रायगड माझा वृत्त 

भिवंडीमध्ये धक्कादायक घटना, छोट्याश्या चुकीने झाला बाप-लेकाचा मृत्यू

भिवंडी शहरातील अवचित पाडा या परिसरात रस्त्यावरील ड्रेनेज लाईनमध्ये बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ड्रेनेज लाईनमधून तबेल्यासाठी अनधिकृतपणे पाणी वापरत  होते. त्यासाठी त्यांनी ड्रेनेज लाईनमध्ये अनधिकृत पद्धतीने मोटरही बसवले होते. पण आज सकाळपासून मोटरमधून पाणी येत नसल्याने मोटर पाहण्यासाठी गेलेला मुलगा का आला नाही म्हणून त्याचे वडील पाहण्यासाठी गेले आणि दोघेही ड्रेनेज लाईनमध्ये अडकून राहीले. बऱ्याच वेळ पाण्यात असल्याने वडिल आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

हे दोघेही ड्रेनेजमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अनेक कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून ते शक्य झालं नाही. त्यानंतर याबद्दल अग्निशमन दलाला सांगण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बापलेकांना बाहेर काढलं. त्यांना लगेचच जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झाला होता.

इलेक्ट्रिक शॉक लागून या दोन्ही बापलेकांचा मृत्यू झाला किंवा ड्रेनेज लाईनमध्ये गुदमरून यांचा मृत्यू असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. दरम्यान, रमेश राठोड वय 19 (मुलगा) चंद्रकांत राठोड वय 50 (वडील) अशी मृतांची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शांतीनगर पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.

तर बाप आणि मुलाच्या अशा जाण्याने राठोड कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत