धक्कादायक : महिना अडीच लाखांची नोकरी सोडून त्यानं सुरू केलं ‘चेन स्नॅचिंग’

होंडाई क्रेटा गाडीतुन आले आणि महिलेचे दागिने हिसकावून झाले पसार

धक्कादायक : महिना अडीच लाखांची नोकरी सोडून त्यानं सुरू केलं 'चेन स्नॅचिंग'

रायगड माझा वृत्त 

दुचाकी वरून येऊन लोकांचे दागिने चोरून पसार झाल्याच्या घटना तर तुम्ही ऐकल्या असतील, मात्र वाशी येथे दोघं चोरांनी चक्क एका होंडाई क्रेटा गाडीतुन येऊन एका महिलेचे दागिने हिसकावून पसार होण्याची घटना घडली आहे.

सध्या पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. अटक केल्यापैकी मुख्यआरोपी सुमित सेनगुप्ता हा पूर्वी पुण्यातील विप्रो कंपनी मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्याला तब्बल अडीच लाख रुपये महिना पगार देखील होता. कौटुंबिक वाद आणि काही कारणास्तव आरोपी सुमितने नोकरी सोडली आहे. उच्च शिक्षित आणि भरगच्च पगार असल्याने सुमितला अनेक नशेच्या सवयी असल्याने त्याला पैशाची चणचण जाणवू लागली. आणि त्यावरूनच आरोपी सुमित हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. प्रथम आरोपीने आपल्या साथीदारा सोबत 9 डिसेंबर रोजी वाशी येथील फॉर्टीज रुग्णालय जवळून एका डॉक्टरच्या क्रेटा कारमध्ये जबरदस्तीने बंदुकीचा धाक दाखवून ती गाडी घेवून पसार झाले होते. तसेच 12 डिसेंबर रोजी एका महिले जवळ गाडी थांवबून पत्ता विचाऱन्याचा बाहण्याने तिचा गळ्यातील दागिने हिसकावून पळून गेले होते. दोन्ही गुन्हे वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. वाशी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि आपल्या सूत्रांमार्फत माहिती घेत आरोपीला 24 तासात अटक केलेय. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत