धक्कादायक; मुंबईतील केईएम रुग्णालयातील शिकावू डॉक्टरची आत्महत्या

 

मुंबई: रायगड माझा वृत्त 

देशभरात सध्या डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळं वातावरण तापले असतानाच आज पहाटे मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

ओंकार ठाकूर हे दादर पश्चिमेकडील कोहिनूर टॉवरमध्ये वास्तव्यास होते. ठाकूर हे केईएम हॉस्पिटलमध्ये फिसीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास राहत्या घराच्या टेरेसवरून त्यांनी उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीनं सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केलं.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाशी त्यांच्या आत्महत्येचा काही संबंध होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत