धक्कादायक! मुकबधीर महिलेवर जवानांनीच केला बलात्कार

पुणे : रायगड माझा वृत्त 

एका मूकबधिर महिलेने लष्कराच्या चार जवानांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पुण्यातील रुग्णालयात ही घटना घडली आहे. या महिलेने तिची तक्रार संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना पाठवली आहे. पुण्यातील खडकी येथील लष्करी रुग्णालयात तैनात असलेल्या चारही जवानांवर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने इंदूरमध्ये तक्रार दाखल केली. तिच्यावर झालेल्या अन्यायासंबंधी तिने संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांना पत्र पाठवले आहे. पीडित महिला विधवा असून तिला एक मुलगा आहे. चार वर्षात या महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

पीडित महिलेने जेव्हा तिच्याबरोबर बलात्कार झाल्याची तक्रार जवानाकडे केली. तेव्हा दुसरा जवान तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला. दोन जवानांनी या महिलेसोबत संबंध ठेवतानाची व्हिडिओ क्लिप बनवली व ते तिला ब्लॅकमेल करत होते असे पोलिसांनी सांगितले.

या महिलेने रुग्णालयात वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली पण कोणीही तिचे ऐकून घेतले नाही. सध्या संपूर्ण देशात #MeToo चळवळ जोरात सुरु असताना हे प्रकरण समोर आले आहे. #MeToo मोहिमेतंर्गत मनोरंजन, मीडिया आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित मंडळींवर गंभीर आरोप झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत