डोंबिवलीत नालेसफाई करताना मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

डोंबिवली : रायगड माझा वृत्त

नालेसफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोंबिवलीनजीक खंबालपाडा परिसरात शुक्रवारी घडली.

खंबालपाडा येथील मार्बल पायलसमोर एमआयडीसीच्या माध्यमातून नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक कामगार मॅनहोलमध्ये उतरला, मात्र आतील उग्र वासामुळे त्याला त्रास होऊ लागला. त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी दोन कामगार मॅनहोलमध्ये उतरले. या तिघांचाही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांमध्ये देविदास चंद्रभान पाजगे (30), महादेव धोंडिबा झोपे (38) आणि चंद्रभान झोपे यांचा समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत