धक्कादायक; मेडिकलमध्ये चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या अज्ञाताकडून तरुणाची गोळ्या घालून हत्या

ठाणे:  महाराष्ट्र News 24 वृत्त

कळवा पूर्व भागात आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलमध्ये चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या अनोळखी व्यक्तीनं दुकानात झोपलेल्या २६ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

कळवा येथील एका मेडिकलचं शटर तोडून चोरटा आतमध्ये घुसला. या मेडिकलमध्ये २६ वर्षीय तरूण झोपला होता. या तरुणाला अचानक जाग आली. त्याचवेळी चोरट्यानं त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचं वातावरण आहे. याबाबत माहिती मिळताच, कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेतील धागेदोरे हाती लागले असून, तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कळवा परिसरात इतर भागातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्यापैकीच कुणीतरी हे कृत्य केलेले असावे, अशी दाट शक्यता आहे. या घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत