धक्कादायक: मेसेज पाठविण्यास मनाई केल्याने मुलीची आत्महत्या

नागपूर : रायगड माझा वृत्त

एका मुलाला सतत मेसेज करत असलेल्या मुलाच्या भावाने सर्व प्रकरण मुलीच्या घरी सांगून तिला समजविण्याचा सल्ला मुलीच्या आई वडिलांना दिला. परंतु ‘मुझे माफ करना, सब अच्छे है, मेरी ही गलती हो गई’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी गौरीनगर भागात उघडकीस आली. राणी कादर हुसेन, असे मृताचे नाव आहे.

राणी ही अकरावीत शिकत होती. ती एका मुलाला सतत मेसेज करीत होती. याबाबत मुलाच्या मोठ्या भावाला कळाले. सोमवारी सकाळी तो राणीच्या घरी आला. तिच्या आई-वडिलाला याबाबत माहिती दिली. राणीला समजावून सांगा, तिला मोबाइल देऊ नका, असे तो म्हणाला. आई-वडिलांनी राणीला समजाविले. या घटनेचा तिच्या मनावर विपरित परिणाम झाला. राणीने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. नातेवाइकांना ती दिसली. नातेवाइकांनी फास काढून तिला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राणीला मृत घोषित केले. याप्रकरणी कळमना पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ए. पी. मेश्राम यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. राणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत