धक्कादायक; रत्नागिरीत तरूणाची गोळ्या घालून हत्या

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

रत्नागिरी शहरात एका तरूणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तरुण गाडी चालवत असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी सरंक्षक भिंतीवर आदळली. आनंद क्षेत्री असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नर्मदा सिमेंट कंपनी जवळ घडली.

गोळी लागल्याने आनंदचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी संरक्षक भिंतीवर धडकली. त्यानंतर आनंदला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पाच मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत