धक्कादायक; रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

मुंबई : रायगड माझा वृत्त 

कुलाबा येथील बधवार पार्क वसाहतीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 58 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. नीता अनिलकुमार अगरवाल असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती अनिलकुमार अगरवाल पश्‍चिम रेल्वेचे मुख्य अभियंता (यांत्रिक) आहेत.

बधवार पार्क येथील एल ब्लॉकमध्ये सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. खाली पडलेल्या नीता यांना तातडीने जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तपासणी करून नीता यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे नीता तणावाखाली होत्या. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचे पत्नी अनिलकुमार अगरवाल हे भारतीय रेल्वे सेवेच्या 1981 मधील तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी 2015 मध्ये पश्‍चिम रेल्वेच्या यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत