धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून महिला पत्रकारावर बलात्कार

 Rape of woman journalist by assurance of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिला पत्रकारावर बलात्कार

अकोट: रायगड माझा  वृत्त

मुंबई गोरेगाव येथील २९ वर्षीय महिला पत्रकाराला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी संतोष शंकर मोरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो पसार झाला होता. त्याला अकोट येथून गोरेगाव पोलिसांनी शहर पोलिसांच्या मदतीने २७ डिसेंबर रोजी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी २९ वर्षीय महिला पत्रकाराला अकोट येथील रहिवासी असलेला संतोष शंकर मोरे (३४) याने पहिले लग्न झालेले असतानाही ते लपवून ठेवत तिची इच्छा नसतानाही शरीरसंबंध ठेवले. तसेच सोबत राहिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून १८ सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी संतोष मोरे याच्या विरुद्ध भादंवि ३७६ (२) एन, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी संतोष मोरे हा मुंबईवरून अकोट येथील त्याच्या राहत्या घरी दडून बसला होता. याविषयी माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी अकोट गाठले. तसेच अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, हे.कॉ. संजय घायल, गुड्डू पठान, विजय सोळंके यांच्या सहकार्याने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अकोट येथे आरोपी संतोष मोरे याला अटक करून न्यायालयात हजर करून आरोपी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडून गोरेगाव पोलीस त्याला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची अकोट शहर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत