धक्कादायक; वहिनी-पुतणीचा खून करून केला मृतदेहावर बलात्कार

नागपूर : रायगड माझा वृत्त 

वहिणी व चिमुकल्या पुतणीचा खून करून त्यांच्या मृतदेहावर बलात्काराची केल्याचा घृणास्पद प्रकार येथील वडधामना-सुराबर्डी तकीया परिसरात घडला आहे. आरोपीला मोबाईलवर ब्लू फिल्म व पॉर्न साइट पहाण्याचे व्यसन होते.

दिराने सख्खी वहिनी व चिमुकल्या पुतणीची बुधवारी (ता. 28) गळा दाबून हत्या केली व त्यानंतर बलात्कार केला. गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांत घटनेचा तपास करून आरोपीला अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाने मुस्लिम महिलेसोबत दुसरे लग्न केल्याने लहान भाऊ नाराज होता. याच कारणाने भाऊ बाहेरगावी गेल्याचे माहीत होताच वहिनी, पुतणीची त्याने गळा दाबून हत्या केली. महिलेचा पती राकेश बिंद हा ट्रकचालक असून तो सकाळीच ट्रक घेऊन बाहेरगावी निघून गेला होता. घरी फक्त लहान मुलगी व तिची आई दोघीच होत्या. याच घरी एका खोलीत एक महिला भाड्याने राहत होती. ती परिसरात चहाचे दुकान चालविते. तीही सकाळीच कामावर निघून गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती घरी परत आली. घरातील विजेचे दिवे बंद दिसल्यामुळे तिने प्रतिभा व रागिणी यांना हाक मारली. प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजारी विचारपूस केली. नंतर शेजाऱ्यांच्या मदतीने टॉर्च घेऊन घरात डोकावून पाहिले असता 35 वर्षीय प्रतिभा व 4 वर्षीय चिमुकली रागिणी दोघीही पलंगावर पडलेल्या अवस्थेत आढळल्या. वाडी पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला सूचना दिली. रात्री 10 वाजता फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले. गुन्हे शाखेने रात्री उशिरा आरोपीला अटक केली. तपासात आरोपीने गुन्हा कबूल केला.

भावाच्या दुसऱ्या लग्नावरून नाराजी
प्रतिभाने राकेश बिंदसोबत दुसरे लग्न केले होते. प्रतिभा ही मुस्लिम समाजाची होती. लग्नानंतर तिचे नाव बदलून प्रतिभा ठेवण्यात आले. कुटुंबातील सदस्य लग्नाच्या विरोधात होते. भाऊ ट्रकचालक असून तो नेहमी बाहेरगावी जातो. आताही तो काही कामानिमित्त ट्रक घेऊन बाहेरगावी गेला असल्याचे पाहून बुधवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी मोठ्या भावाच्या घरी पोहोचला. तिथे त्याचा वहिनी प्रतिभासोबत वाद झाला. याच वादात त्याने प्रतिभाचा गळा दाबून खून केला. रागिणी रडायला लागली तेव्हा आरोपीने तिच्यावरही दया न करता रागिणीचा आवळला. दोघींचा खून केल्यानंतर त्याने दोघींच्या मृतदेहावर बलात्कार केला.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रतिभा यांचा दीर चंद्रशेखर बिंडला अटक केली आहे. चंद्रशेखरने डीफार्म केलं असून तो एका औषधाच्या दुकानात कामाला आहे. परंतु त्याला ब्लू फिल्म आणि पॉर्न साईट्स पाहायला आवडायचे. त्यामधूनच हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत