धक्कादायक; विवाहाच्या दहा महिन्यांतच पत्नीची आत्महत्या

 

नागपूर : रायगड माझा वृत्त 

पतीसोबत किरकोळ वाद झाल्यामुळे 30 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. रंजना मनोज मसराम (30) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल नगर परिसरात राहणाऱ्या रंजना यांचे दहा महिन्यांपूर्वी मनोजसोबत लग्न झाले होते. दोघेही गोपाल नगरात दिलीप गांगुलीच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होते. आपला उदनिर्वाह चालविण्यासाठी मनोज भाजीपाला विकायचा तर रंजना स्वयंपाकाच्या कामावर जात होती. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत दोघांचाही संसार सुरू होता. पती मनोजला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे कसेबसे भाजीपाल्यातून आलेले पैसे तो दारूच्या व्यसनावर उडवित होता. त्यामुळे पती-पत्नीने भांडण नेहमीच व्हायचे. भाजीपाला विकताना तो ग्राहकांना थोडे झुकते माप द्यायचा. भाजीपाल्याचा धंदा डबघाईस आल्यामुळे रंजनाचे पतीसोबत भांडण होत असे.

वादानंतर गळफास 

दोन दिवसांपूर्वी यावरून दोघांमध्ये चांगलेच कडाक्‍याचे भांडण झाले. त्यामुळे रंजनाने पतीचे सामान खोली बाहेर फेकून त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर पती मनोज नातेवाईकाकडे गेला. पतीचे दारूचे व्यसन आणि सतत होत असलेले भांडण यामुळे शनिवारी दुपारी 3.20 वाजताच्या सुमारास घरी सिलिंगच्या कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

रंजना ही रागीट आणि चिडखोर स्वभावाची होती, अशी माहिती पुढे आली. नेहमी नवऱ्यासोबत कोणत्या ना कोणत्या कारणातून भांडण करीत होती. क्षुल्लक कारणातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत