धक्कादायक! व्यक्तीने क्रुरतेने पत्नी आणि तीन चिमुकल्यांची हत्या करून स्वत:ही घेतला गळफास

 अलाहाबाद : रायगड माझा वृत्त

किरकोळ भांडणामुळे एका व्यक्तीने क्रुरतेने पत्नी आणि तीन चिमुकल्यांची हत्या करून स्वत:ही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये ही घटना घडली आहे.

डीएनएच्या रिपोर्टनुसार, अलाहाबादच्या धूमनगंज परिसरातील पीपल गावमध्ये मनोज कुशवाह (३५) यांने आपल्या कुटुंबातील चार जणांची हत्या करत स्वत:ही जीवन संपवले. मनोज कुशवाह याने पत्नी श्वेताला (३०) मारल्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर चाकूने वार करत प्रिती (८), शिवानी (६) आणि श्रेया (३) या तिन्ही मुलीचे आयुष्य संपवले. एका मुलीचा मृतदेह बॉक्समध्ये ठेवला, तर दुसऱ्या मुलींचा मृतदेह कपाटात लपवून ठेवला आणि तिसऱ्या मुलीला मारुन जमिनीवरच ठेवलं. त्यानंतर स्वत: पंख्याला लटकून गळफास घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उशीर झाला तरी कोणी दरवाजा उघडत नाही. कोणी बाहेर येत नाही पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद झाला होता, तो वाद चौघींची हत्या आणि आत्महत्यापर्यंत पोहोचला, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. पोलिस परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर ही हत्या आणि आत्महत्या आहे की, बाहेरच्या कोणा व्यक्तीचा या घटनेत हात आहे, हे स्पष्ट होईल

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत