धक्कादायक..शिवनेरी किल्ल्यावर तरूणीची आत्महत्या, गडाच्या पायथ्याशी सापडली दुचाकी

पुणे: रायगड माझा 

शिवनेरी किल्ल्यावर एका तरुणीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. सुहानी रघुनाथ खंडागळे (रा.पिंपळगाव सिद्धनाथ, ता.जुन्नर) असे मृत तरूणीचे नाव आहे. किल्ल्यावरील पहिल्या दरवाज्याजवळ शुक्रवारी पहाटे सुहानीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

गडाच्या पायथ्याशी सापडली दुचाकी..

पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. गडाच्या पायथ्याशी सुहानीची दुचाकी (MH14-W9426) सापडली आहे. तसेच दुचाकीजवळ एक स्कूल बॅगही सापडली आहे. बॅगवर कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल असे नाव लिहिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत