धक्कादायक; सोळा वर्षीय मुलीने केली दोन वर्षांच्या मुलीची हत्या

मुरबाड : रायगड माझा वृत्त

अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीची शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यातील तुळई गावात शनिवारी रात्री समोर आला आहे. हत्येनंतर या मुलीने मृतदेह घराच्या पोटमाळ्यावर लपवून ठेवला होता. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचे कारण अद्याप उलगडलेले नसल्याने घटनेचे गूढ अधिकच काढले आहे.

मुरबाडच्या तुळई गावातील मनिष्का जाधक ही दोन वर्षांची चिमुरडी शनिवार दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती. बराच वेळ शोध घेऊनही आढळून न आल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मुरबाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर मनिष्काचा मृतदेह शेजारच्या घरातील पोटमाळ्यावरून ताब्यात घेतला. या प्रकरणी प्रेरणा (16) (नाव बदलेले आहे) हिने मनिष्काचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्याने तिला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रेरणा सध्या दहावीला असून मनिष्का तिची नातेवाईक होती. पोलिसांनी प्रेरणाच्या कुटुंबीयांनाही ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत