धनगर आरक्षण स्मरण आंदोलन

पिंपरी : रायगड माझा 

धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन बारामती येथे झालेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनास आज 4 वर्षे पुर्ण झाली. या ऐतिहासिक आंदोलनाचे स्मरण सरकारला व्हावे या हेतुने पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्या वतीने पिंपरीतील अहल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर भर पावसात आरक्षण स्मरण आंदोलन करण्यात आले.

सरकारने येत्या 4 ते 5 महिन्यात कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावे आणि बारामती मधील आंदोलनकर्त्यांना आंदोलन थांबविण्यासाठी दिलेला आपला शब्द पुर्ण करावा, अशी मागणी आंदोलनाव्दारे करण्यात आली. मागील 60 वर्षे कॉंग्रेसने समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. म्हणून मागील निवडणुकीत समाज भाजपच्या पाठिशी राहिला आणि जर भाजप सुध्दा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणार असेल तर धनगर समाज आपल्या न्याय हक्कासाठी सरकारच्या विरोधात जायला कमी करणार नाही, अशा संतप्त भावना आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, अशोक खरात, वीणा सोनवलकर, उमेश बरकडे, श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, गोरख खामगळ, महादेव कवितके, बंडू मारकड, कैलास कोपनर, तानाजी कोपनर, दाजी वायकुळे, दादा कोपनर, सागर मारकड, गणेश देवकाते, धनंजय गाडे, नागेश तितर, सदाशिव पडळकर, रणजित गोरड, दत्ता शेंडगे, महावीर काळे, भरत गोयेकर, बिरु व्हनमाणे, अजय दुधभाते, नवनाथ बिडे, रुपेश रुपनर, शिवाजी बिटके, दत्ता सोनवलकर, सचिन शिंदे, गणेश खरात, तुकाराम वाघमोडे, अनुराज दुधभाते आदी उपस्थित होते.

भाजपला “घरचा आहेर’
या आंदोलनात भजपचेच काही पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे सत्तेत असूनही मागण्या पूर्ण होत नाहीत तसेच सत्ताधिकारी पदाधिकाऱ्यांनाच रस्त्यावर उतरून भर पावसात आंदोलन करावे लागते. आपल्याच सरकारला त्याचे स्मरण करुन द्यावे लागते. हा भाजपाला एक प्रकारे “घरचा आहेर’ असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत