पुणे : रायगड माझा वृत्त
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाने आक्रमक स्वरूप केले असून, धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी म्हणून आलेल्या धनगर समाजाच्या दोन कार्यकर्त्यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात तोडफोड करत भंडारा उधळला.
कार्यालयातील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार.. दुपारी 1.30 च्या आसपास धनगर समाजाचे कार्यकर्ते आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आले होते. यावेळी आचानक यातील दोन कार्यकर्त्यांनी पत्रके भिरकावत भंडारा उधळला. यावेळी कार्यालयातील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली. तसेच कपाटाच्या काच फोडण्यात आल्या. त्यानंतर आलेल्या दोघांनी पळ काढला. या घटनेच्या माहिती मिळताचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरू केला आहे