धनगर समाजाचा पहिला बळी औरंगाबादमध्ये

पैठण : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षण आंदोलनाचाही पहिला बळी गेला आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे एका तरुणाने आत्‍महत्या केली. परमेश्वर घोंगडे असे आत्‍महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पालकांचे जबाब सुरू आहेत.

परमेश्वर याने १ ऑगस्‍ट रोजी पुण्यात धनगर आरक्षणासाठीच्या मेळाव्यात जाण्यासाठी घरात पैसे मागितले. मात्र घरची परिस्‍थिती हालाकीची असल्याने पालकांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर ३ ऑगस्‍ट रोजी परमेश्वरने चिठ्ठी लिहून ठेवून आत्‍महत्या केली. यामध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तात्‍काळ लागू करावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आई-वडिलांनी परमेश्वरने धनगर आरक्षणासाठीच आत्‍महत्या केल्याचे म्‍हटले आहे. त्यानंतर धनगर समाजातील लोक आक्रमक झाले असून पोलिस ठाण्यासमोठ ठाण मांडून बसले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत