धर्मानंद गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

नेरळ: अजय गायकवाड 

नेरळ मध्ये महायुतीची आघाडी यामध्ये लढत असताना प्रभाग क्रमांक दोन मध्ये मात्र एकतर्फी लढतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीच्या दिगज्जांना प्रचारात उतरवून धर्मानंद गायकवाड यांनी प्रचारात रंगात आणली आहे.

पत्रकार धर्मानंद गायकवाड हे प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचार फेर्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या प्रचारासाठी माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे , तालुका प्रमुख उत्तम कोळंबे , सरपंच जान्हवी साळुंके , आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यासह भाजप आरपीआयचे नेते प्रचारात उतरल्याने प्रभाग दोन मधील लढत एकतर्फी झाली आहे. धर्मांनंद गायकवाड आणि त्यांच्या प्रभागातील अन्य उमेदवारांनी मोहाचीवाडी परिसरात घरोघर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि परिसरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले  यावेळी धर्मानंद गायकवाड यांच्या मोहाचीवाडी येथील प्रचार कार्यालयाचे महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी धर्मानंद गायकवाड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आता पर्यंत नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आता लोकप्रतिनिधी म्हणून ते या समस्या सोडवतील असा विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. एकूणच धर्मानंद गायकवाड यांना मिळणार प्रतिसाद अन्य दोन उमेदवारांसह युतीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवारांना लाभदायक ठरत असल्याचे दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत