धाटाव एमआयडीसीत भीषण आग ; ५० दुचाकी जळून खाक

धाटाव : शशीकांत मोरे

रोहयातील धाटाव औद्योगिक वसाहतीतिल डी आर टी एंथिया एरोमैटिक कारखान्याला आज सायंकाळी ५ दरम्यान भीषण आग लागली .या आगित हा कारखाना अक्षरशः भस्मसात झाल्याचे डुसुन आले.अगिमुळे परिसरात धुराचे लोढ़ सर्वत्र पहाव्यास मिलाले.या ५० दुचाकी जळून खाक झाल्याचे समजते.अक्षरशः आगिचे तांडव निर्माण झाल्यामुळे भीषण दाहकता जाणवत होति. अगिने रौद्र रूप धारण केल्याने एका मागोमाग अशा प्लांटला आग लागल्यामुळे आग विझवन्यासाठी अडथळा निर्माण होत होता. दरम्यान काम करीत असलेल्या कामगाराना कम्पनितुन बाहेर काढ़न्यात आल्याने सुदैवाने जिवितहानी टळली.
आज सोमवार दी.१९ फेब्रूवारी रोजी सायंकाळी ५ वा.दरम्यान धाटाव मधील डी आर टी एन्थिया एरोमैटिक या कारखान्यात रासायनिक प्रक्रिये दरम्यान टोलवींन या रसायनाच्या ड्रमला अचानक आग लागली.या अगिन रौद्र रुप धारण करीत एक प्लांट बरोबर दुसऱ्या प्लांटला झल बस्ताच एका मागोमाग एक अशा तिन्ही प्लांटला आग लागली.या आगिची दाहकता भीषण असल्यामुळे नजिकच्या रोठ बुध्रुक गावातील गावक्रयाना गावातुन हलविन्यात आले. तर नजिकच्या अनशूल व डानसमन्द या करखांयाना सुद्धा भीति निर्माण झाली होती.सुप्रीम,रिलायंस,रोहा नगरपालिका धाटाव अग्निशामक दलाचे बम्ब याठिकाणी तत्काल हजर होऊन आग आटोकयात आंनयाचे प्रयत्न सुरु होते. तर नजिकच्या कारखान्यातिल कामगार वर्ग सुद्धा मद्त करीत होते.
या आगिची बातमी कळताच तहसीलदार,पोलिस यंत्रणा,व्यवस्थापकीय अधिकारी यानी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केलि.तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळा नंतर आग कमी झाली.या परिसरात सर्वत्र नागरिकांची मात्र धावपळ सुरु असल्याचे पहावयास मिळाले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत