धाटाव औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणावर प्रदुषण मंडळाचे दुर्लक्ष

रोहे : महादेव सरसंबे

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामुळे धाटाव परीसरात प्रदुषण वाढले आहे.हवा प्रदुषण होत असल्याने या नजीक असलेली भातशेती पिवळी पढत आहे.गंगा नाल्यात आथव कुंडलिका नदीत हिरवे व पिवळया रांगाचे पाणी येत आहे.प्रदुषणा मुळे नागरीक हैराण झाले आहेत.तरी सुध्दा प्रदुषण मंडळ व संबधीत प्रशासन लक्ष देत नाही.पाणी दुषीत, शेती करपली, हवा प्रदुषण होत असताना प्रदुषण मंडळाच्या अधिका-यांना हे दिसत नाही का असा सवाल ग्रामस्थांनी विचाराला. एम.आय.डी.सी. व प्रदुषण मंडळाचे या बाबी कडे सायीस्कर दुर्लक्ष होत असुन प्रदुषण मंडळाचेे अधिकारी निशाचरासारखे पाहणी करून जात असल्याचा संशय व्यक्त करीत यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नागरीकांनी व उपस्थित पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच, पोलिस पाटील यांनी केली आहे.

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील व परीसरातील कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक रोहा उपविभगीय कार्यालयात घेण्यात आली असुन या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरीकांनी स्थानिक प्रशासन, एम.आय.डी.सी. व प्रदुषण मंडळाकडे विविध उपायोजना करण्यासंदर्भात सुचना व मागणी केली.

या वेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले, तहसिलदार सुरेश काशिद, पोलिस निरीक्षक अजमुददीन मुल्ला, एम.आय.डी.सीचे निंबाळकर, प्रदुषण मंडळाचे अधिकारी बा.वी मालवेकर, आर.आय.चे सेक्रेटरी भालचंद्र सप्रे, तहसिल कार्यालयाचे राजेश थोरे, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, मनसे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अमोल पेणकर, सरपंच सतिष भगत, दिनेश मोरे, उपसरपंच अमित मोहीते, संदेश मोरे, भाजप सरचिटणीस संजय लोटणकर, शेकाप चिटणीस मंडळाचे विठ्ठल मोरे, काँगेस पर्यावरण जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे, खेळू ढमाल, ज्ञानेश्वर सांळुखे, दत्ता चव्हाण, रमेश मोरे, पोलिस हरेश्वर सुर्वे, घनशाम कराले, निलेश वारंगे, सागर भगत, भाऊ चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

या सभेत संजय कोनकर, सतिष भगत, सोपान जांबेकर, सचिन मोरे, अमित मोहीते, घनशाम कराले, अमोल पेणकर आदीनी विविध प्रदुषणाच्या समस्या बाबत काय उपाय योजना करण्यात येणार आहे.या बाबत प्रदुषण मंडळाच्या अधिका-या ंकडे विचारणा केली.या मध्ये धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून नाले वाटे येणारे कुंडलिका नदीत दुषित पाणी, हवा प्रदुषणामुळे व विषारी वायु मुळे भातशेती पिवळी पडली, शेत जमिन नापिक होत आहे. त्याच बरोबर कारखान्यातील प्रक्रिया केलेले पाणी थेट कुंडलिका नदीत न सोडता समुद्रात सोडवे यासाठी चालु असलेले काम कधी पुर्ण होणार असे अनेक प्रश्न या वेळी विचारणात आले.

यावर उपाययोजना काय करणार असा सवाल या वेळी विचारणात आला.धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या आरोग्य प्रश्न बाबत या वेळी लक्ष वेधले.कामगार जखमी झाले तर त्यांना उपचार मुंबर्इ येथे करावे लागते.त्यांना रोहा सारख्या आथवा नागोठणे परीसरात आरोग्य सेवा उपलब्ध करावी अशी मागणी या वेळी उपस्थितांनी केली.धाटाव औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यात नागरीकांना डेंगुची लागण झाली आहे.यावर खाबरदारी म्हणुन कोणती उपायायोजना करणार असा सवाल या विचारण्यात आला.यासह वाहन तळ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील सुरक्षा, औद्योगिक क्षेत्रात अपत्तकालीन समयी उपलब्ध पाणी पुरवठा व त्याची यंत्रणा सक्षमीकरण, औद्योगिकक्ष क्षेत्रात शौचालय उपलब्ध करणे आदी प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले.

यातील काही प्रश्नावर लवकारात लवकर थोडगा काढण्यात येणार आहे.त्या संबधीत वरीष्ठ पातळीवर चर्चा चालु आहे.यासह काही सुचना आहेत.त्यावर काळजी पुर्वक विचार करून सोडविण्यासाठी संबधीत खात्यांना सुचना या बैठकी निमित्ताने देण्यात येतील असे या वेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.या सभेला लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिस पाटील, पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत