धावत्या रेल्वेतून मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

नाशिक : रायगड माझा वृत्त 

रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सोमवारी (दि़१९) सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़

ठाणे येथील वाचळेनगरमधील रहिवासी मनोज सोनवणे (२१) या विद्यार्थ्याची औरंगाबादला परीक्षा होती़ या परीक्षेसाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कल्याण येथून बसला़ रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटल्यानंतर हायवे ओव्हरब्रिजजवळ रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या मनोजच हातास झटका देऊन आरोपी आकाश जाधव याने मोबाइल हिसकावला़ यामध्ये ते रेल्वेतून खाली पडल्याने डोक्यास व कपाळावर जखम तसेच हात फॅक्चर झाला होता़ या प्रकरणी आरोपी जाधव याच्या विरोधात नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़

जिल्हा व सत्र न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़ न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी जाधव यास सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत