धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे

मुंबई : रायगड माझा वृत्त

सीएसटीएमहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणाने तरुणीला पाहून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची आधी तक्रार नोंदवण्यास नकार देणाऱ्या रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच तक्रार नोंदवून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. सीएसटीएमकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीला महिला डब्यात एकटं पाहून बाजुच्या कोचमध्ये असलेल्या एका तरुणाने अश्लील चाळे केले. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली आणि जोरात ओरडली. त्याच कोचमधून प्रवास करणाऱ्या जितेश उत्तेकर या प्रवाशाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला असता अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये म्हणून तोंड लपवले होते. उत्तेकर यांनी या तरुणाला हटकले आणि या तरुणीला वडाळ्याला उतरून रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितली. पण ही तरुणी घाबरलेली असल्याने ती रेल्वे पोलिसांकडे गेली नाही. त्यामुळे हा तरुण स्वत: पोलिसांकडे गेला आणि तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र संबंधित तरुणीनेच तक्रार नोंदवायला हवी. असं सांगून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचं या तरुणाने सांगितलं. मात्र हा प्रकार सोशल मीडियावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत