धोकादायक विद्युत खांब बदलण्यास महवितरण ऊदासिन ;सुरक्षेसाठी खांबाला साकडे

खालापूर – मनोज कळमकर 

 

खालापूरात रोहिदासनगर मधील लोकवस्तीत मध्यभागी असलेला लोखंड़ी खांब तळाशी जीर्ण झाल्यामुळे कोणत्याहि क्षणी कोसळून अपघाताची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर सुद्धा महावितरणाचे दुर्लक्षामुळे अखेर रोहिदासनगरवासियानी खांबाची पूजा करित सुरक्षसेसाठी साकङ घातल आहे.

खालापूर नगरपंचायत हद्दीतील रोहिदास नगरामधील जितेंद्र भोईर यांच्या घरासमोर विद्युत वाहक तारांसाठी बसविण्यात आलेला लोखंड़ी खांब पन्नास वर्ष जुना असून खांब तळाशी गंजून मोठे छिद्र पड़ल्यामुळे कमकुवत झाला असून धोकादायक बनला आहे. खांब कोसळल्यास घरांचे नुकसान होणार आहेच शिवाय लहान मुलांची खेळण्याची जागा व रहदारी असल्यामुळे एखादी अनुचित घटना घड़ण्याची शक्यता आहे.हा खांब बदलण्यासाठी 27ङिसेंबर 2017मध्ये खालापूर महवितरण कार्यालयाकङे लेखी अर्ज करण्यात आला होता.तसेच नगरपंचायत कार्यालयात देखील माहिती देण्यात आली होती.परंतु सहा महिने होऊनही प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्यामुळे रहिवाशी संतप्त आहेत. खांबाची विधिवत पूजा करून पावसाळ्यात वादळ वा-यात टिकाव धरून रहा अशी प्रार्थना रोहिदासनगर मधील कूटूंबानी केली आहे.

धोकादायक खांब त्वरित बदलावा यासाठी महावितणाला लेखी तक्रार अर्ज देवून सुद्धा खांब उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते.परंतु उद्योगाना तसेच व्यावसायिकाना तातङीने खांब उपलब्ध होतात.महावितरणाच्या विरोधात आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबिणार आहोत. – यशवंत भोईर-रोहिदासनगर रहिवाशी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत