धोका; फेसबुक फ्रेंड निघाला यूपीचा वॉन्टेड आरोपी, हॉटेलमध्ये केला बलात्कार

Rape on girl by facebook friend, wantedcr iminal

उत्तर प्रदेश : रायगड माझा वृत्त 

उत्तर प्रदेश येथे राहणा-या एका तरुणीला फेसबुक फ्रेंडसोबत मैत्री करणे चांगले भोवले. हा तरुण तरुणीला पार्टीमध्ये नेत असल्याचे सांगून चंदीगढच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान मुलीने पोलिसांना बोलावले तर त्या आरोपीने हॉटेलच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारली.

फेसबुकवर झाली होती मैत्री 
ही घटना सोमवारची आहे. आरोपी आणि पीडिता दोघंही रामपुर जिल्ह्यात राहतात. काही महिन्यांपुर्वी फेसबुकवर दोघांची मैत्री झाली. दोघं सतत एकमेकांना बोलायचे. नंतर दोघांचे फोनवर बोलणे होऊ लागले. यानंतर काही काळाने दोघांचाही जास्त दिवस संपर्क झाला नाही. पण नुकतेच त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. दोघांची भेट झाली. यादरम्यान तो तरुणी तरुणीला म्हणाला की, आपण पार्टीमध्ये जाऊ तेव्हा मुलगीही तयार झाली. दोघंही रामपुर येथून चंदीगढला गेले. येथे तरुणाने एका हॉटेलमध्ये रुम घेतली. या आरोपीने तरुणीवर बलात्कार केला असा आरोप आहे. तरुणीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली.

तरुणीने पोलिसांना केला फोन 
याच दरम्यान संधी साधून तरुणीने पोलिसांना फोन केला. पोलिस हॉटेलच्या तिस-या मजल्यावर पोहोचताच त्या आरोपीने हॉटेलच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीविषयी विचारपूस केल्यावर कळाले की, तो उत्तर प्रदेशातील एक फरार गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द अनेक तक्रारी आहे. यामध्ये हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्टच्या प्रकरणांचाही समावेश आहे. या आरोपीची ओळख 30 वर्षीय अमन उर्फ हॅरी नावाने झाली आहे. यूपी पोलिस बरेच दिवसांपासून त्याच्या शोधात होते. पोलिसांनी त्याला सतत विचारणा करत आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी पाठवण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत