धोनी निवृत्ती नंतर काय करणार?; चर्चांना पूर्णविराम

रायगड माझा वृत्त 

भारताचा यष्टीरक्षक आणि कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी भारताच्या लष्करात पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेणार असल्याचं स्पष्ट झालं. धोनीला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. तो पॅराशूट रेजिमेंटच्या 106 बटालियनमध्ये तैनात आहे. धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही म्हणजे तो निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. अखेर धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात रिषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे.

धोनीला लष्करप्रमुखांनी रेजिमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी परवानगी दिली आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी लष्कराच्या गाडीतून उतरून जय हिंद म्हणत सलाम करताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान धोनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत