नंदुरबार जिल्ह्यात दाेन दिवसांपूर्वीच टळली तीन मजूर, पाच भिक्षुकांची हत्या

नंदुरबार : रायगड माझा 

 धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरजवळील (ता. साक्री) एका छाेट्याशा गावात रविवारी पाेरधरी अाल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची बेदम मारहाण करत हत्या केली. साेशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ठिकठिकाणी अशा हिंसक घटनांचे लाेण पसरू लागले अाहे. दाेनच दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील दाेन गावांत मुले पळवणाऱ्या टाेळीचे सदस्य समजून सलग दाेन दिवस जमावाकडून संशयित व्यक्तींना मारहाणीच्या दाेन घटना घडल्या. मात्र या ठिकाणी पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीत सापडलेल्या तीन मजूर व पाच भिक्षुकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले अाणि निष्पाप लाेकांच्या हत्येचा नंदुबार जिल्ह्यावरील कलंक टळला.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद येथे पंढरपूर (जि. साेलापूर) येथील मजूर राेजगाराच्या शाेधासाठी अाले हाेते. २८ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हे लाेक गावात फिरत असताना गावकऱ्यांना त्यांच्याबाबत संशय अाला. साेशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांचा त्याला संदर्भ हाेता. लहान मुलांना पळवून नेण्यासाठीच हे लाेक गावात अाल्याचा समज झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना घेरून बेदम मारहाण केली. या जमावाच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून अापल्या वाहनासह पळालेल्या तीन मजुरांनी थेट पाेलिस ठाणे गाठले व संरक्षणाची मागणी केली. सुमारे एक हजार लाेकांच्या जमावानेही त्यांची पाठलाग केला, मात्र पाेलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तीनही मजुरांना संरक्षण दिले, तसेच जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लाेक अाक्रमक झाले हाेते. त्यांनी पाेलिस ठाणे परिसरात उभ्या असलेल्या या मजुरांचे वाहनच जाळून टाकले. पाेलिस ठाण्यात पाेहाेचण्यापूर्वी या मजुरांची गाडी जमावाच्या हाती लागली असता तर अनर्थ झाला असता, अशी भीती वर्तवली जात अाहे. दरम्यान, नंतर पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत या तिन्ही संशयितांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून ते राेजगाराच्या शाेधात गावात अाल्याचे स्पष्ट झाले.

दुसरी घटना : पाेलिस पाटलांनी वाचवले भिक्षुकांना 
२९ जून रोजी सकाळी ९ वाजता नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे पाच भिक्षुकांना मुले पळवणारी टोळी समजून जमावाने घेराव घातला. जमाव त्यांच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात गावचे पाेलिस पाटील महेंद्र बच्छाव तसेच सरपंच प्रकाश पाटील यांनी समयसूचकता बाळगून जमावाला शांत करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच या संशयित पाच जणांना एका मंदिरात अाश्रयाला ठेवले व जमाव त्यांच्यापर्यंत पाेहाेचू नये म्हणून मंदिराला बाहेरून कुलूप ठाेकले. नंतर पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत हे पाचही भिक्षुक राेजीराेटीसाठीच गावात अाल्याचे व त्यांचीही काेणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्पष्ट झाले.

अफवा राेखण्यासाठी गावागावात दवंडी, बैठका 
या दाेन घटनांची प्रशासनाच्या वतीने गांभीर्याने दखल घेण्यात अाली. अशा घटना टाळण्यासाठी पाेलिस पाटलांची बैठक घेण्यात अाली तसेच गावागावात दवंडी पिटवून जनजागृती करण्यात येत आहे. ‘मुले चोरी करणारी टोळी’ ही अफवा आहे, यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे पोलिस सांगत अाहेत. धुळे जिल्ह्यात अशीच समयचूकता पाेलिस व प्रशासनातर्फे करण्यात अाली नाही.

भाषेच्या अडचणीमुळे वाढताहेत गैरसमज 
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतमजूर माेलमजुरीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यात येत असतात. पूर्वी हे मजूर खान्देशातील स्थानिक मुकादमामार्फत कामे मिळवायचे. त्यामुळे राेजंदारीच्या उत्पन्नातील काही वाटा त्यांना मुकादमांनाही द्यावा लागायचा. नंदुरबार जिल्ह्यातील अादिवासींना, शेतमालकांना या मजुरांची मराठी भाषा समजत नाही. त्यामुळे मुकादम त्यांच्यात दुवा साधण्याचे काम करायचे. मात्र अाता मजुरीतील ‘दलाली’ टाळण्यासाठी हे मजूर मुकादमांना टाळून स्वत:च या भागात येऊन काम मिळवू लागले अाहेत. मात्र एकमेकांची भाषा कळत नसल्याच्या अडचणीतून म्हसावद गावातील लाेकांचा या मजुरांविषयी गैरसमज झाला असावा, अशी शक्यता अाता वर्तवण्यात येत अाहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.